Advertisement
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात पार पडणाऱ्या नित्यपुजा, पाद्यपुजा, तुळशी अर्चन पूजा आणि महानैवेद्य या सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. त्यासाठी आता 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीदरम्यान होणाऱ्या पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात 28 जुलै 2025 पासून सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमारास सुरू होणार आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
पंढरपुरातील या पुजेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना https://www.vitthalrukminimandir.org अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे, जिथं त्यांना यासंदर्भातील सविस्कर माहिती, पुजेचं स्वरुप आणि शुल्क यासंदर्भातील माहिती मिळेल. वर नमूद करण्यात आलेल्या तारखांदरम्यान सण, उत्सव आणि गर्दीचे दिवस वगळता इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपुजेसह पाद्यपुजा, अशा पुजांसाठी ही नोंदणी केली जाईल. भाविकांना अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या वतीनं 02186 -299299 हा दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला आहे.