Advertisement
मुंबई : कृषी विभागाच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांना न्यायालयानं क्लिनचिट दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदी संधी देणार असल्याचे संकेत दिले आहेत. कराड प्रकरणातून मुंडेंना क्लिनचीट मिळाल्यानंतर त्या प्रकरणाशी त्यांचा संबंध नसल्याचं सिद्ध झाल्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिपद देऊ, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्यावर न्यायालयानं काय सांगितलं? त्यांना त्या प्रकरणात क्लिनचिट देण्यात आली, त्या प्रकरणात त्यांचा कुठेही दोष नाहीये, आता अजून त्यांच्या संदर्भातील एक गोष्ट आहे, त्यावर देखील पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं कारवाई करत आहे, या प्रकरणात जर त्यांना क्लिनचिट मिळाली तर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिपद देऊ असं अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
म्हणून मुंडे यांनी दिलेला राजीनामा
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट होती. या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आलं, त्याला संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा मानला जातो. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे विरोधकांकडून सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला होता, अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, प्रकृतीच्या कारणांमुळे आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत, असं त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं.