Advertisement
अजित पवारांचं टेन्शन वाढलं
सोलापूर : शहरात आलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना गटबाजीचे दर्शन झाले. शहर जिल्हाध्यक्षा आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांचे एकाच दिवशी दोन स्वतंत्र मेळावे झाले. शहराध्यक्ष संतोष पवार यांनी प्रदेश पातळीवरून नेते परस्पर पदे घेऊन येत असल्याची तक्रार केली. शिवाय जिल्हाध्यक्ष शहराच्या हद्दीत येऊन नगरसेवक किती आणि कसे निवडून आणायचे सांगत आहेत. त्यामुळे पक्षाची शिस्त बिघडत असल्याचे लक्षात आणून दिले. सुनील तटकरे यांनी दिलासा देत म्हणाले की, पदाधिकारी निवडीत शहर कार्यकारिणीला विचारले जाईल.
शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शहराच्या हद्दीत येऊन नगरसेवक किती आणि कसे निवडून आणायचे सांगत आहेत. पक्षात आज कुणीही उठसुठ मुंबईला जातो आणि पद आणतो, निधी आणतो. कार्यकर्त्यांची दिशाभूल करतो. पक्ष संघटनामध्ये त्यांचे काहीच योगदान नाही. विश्वासात घेतले जात नसल्यामुळे पक्षातील वातावरण खूप डिस्टर्ब होत आहे. पक्षाने ज्यांची हकालपट्टी केली होती त्यांना मुंबईला घेऊन जाऊन पदे दिली जात आहेत. हक्क असलेल्यांना संधी मिळत नाही. स्थानिक, निष्ठावंत कार्यकर्ता निराश होत आहे. पक्षाची शिस्त बिघडत आहे, अशा नाराजी पक्षातील पदाधिकऱ्यांनी व्यक्त केली.