Advertisement
दिवाळीपर्यंत सोनं आणखी महाग होणार
मुंबई : सोन्याच्या दराने मंगळवारी संध्याकाळी (Gold Rate on 22 July 2025) नवा उच्चांक प्रस्थापित केला. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातील तेजी कायम असल्याचे पाहायला मिळते आहे. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्या-चांदीचे दर खालीलप्रमाणे आहेत.
आज सोन्याचा विक्री दर काय आहे?
- स्टँडर्ड 99.5 सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,00,000 रुपये इतका आहे.
- 22 कॅरेट 916 सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 93,000 रुपये नोंदवला गेला आहे.
- 18 कॅरेट 750 सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 78,000 रुपये आहे.
- 14 कॅरेट 583 सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 65,000 रुपयांवर पोहोचला आहे.
सोन्याचा खरेदी दर
- स्टँडर्ड 99.5 सोन्यासाठी खरेदी दर प्रति 10 ग्रॅम 99,000 रुपये
- 22 कॅरेट 916 सोन्याचा खरेदी दर प्रति 10 ग्रॅम 91,000 रुपये.
- 18 कॅरेट 750 सोन्यासाठी खरेदी दर प्रति 10 ग्रॅम 76,000 रुपये.
- 14 कॅरेट 583 सोन्याचा खरेदी दर प्रति 10 ग्रॅम 63,000 रुपये इतका.