Advertisement
OBC नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र रद्द
नाशिक : भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) माजी प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्याविरोधता सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकरचं OBC नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. नागरी सेवेत फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकरवर आहे.
पूजा खेडकरचं ओबीसी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय. नाशिक विभागीय आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. 2022 च्या नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकरवर आहे. तिची प्रोबेशन आधीच संपुष्टात आली आहे. दरम्यान, नाशिक विभागीय आयुक्तांनी तीचा नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र महिनाभरापूर्वीच फेटाळला होता. त्यानंतर तीनं राज्य इतर मागासवर्गीय विभागाच्या सचिवांकडे अपिल केलं होत.
खेडकर यांनी आता राज्य इतर मागासवर्गीय वर्ग (ओबीसी) विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळाज यांच्याकडे रद्द केल्याप्रकरणी अपील केले आहे. सुरुवातीपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या कुंभार यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं. पूजा खेडकर प्रकरणात कारवाईला उशीर लागत असला तरी आज ना उद्या सर्व बाहेर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून पूजा खेडकरनं यूपीएससीमध्ये निवडीसाठी विशेष सवलत मिळवली. तसेच परीक्षेत कमी गुण मिळवूनही सवलतीच्या आधाराचा वापर करून परीक्षाही उत्तीर्ण झाली. यूपीएससीमध्ये 841 वा रँक मिळवला होता. आता दिल्ली पोलिसांनी तपासादरम्यान दिव्यांग प्रमाणपत्राचा खोटेपणा उघड केला होता.