Advertisement
नियम लागू होणार, चांदीपण महागणार
दिल्ली : केंद्र सरकारने चांदीच्या शुद्धतेबाबत एक महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्किंगची मोहोर उमटणार आहे. जीएसटीसह प्रति किलो चांदीची किंमत एक लाख 16 हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळं चांदीत भेसळ होण्याची शक्यता असते. त्यासाठीच सरकारने आता चांदीवरही हॉलमार्क लागू केला आहे.
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्स (BSI) ने स्पष्ट केले आहे की, हॉलमार्किंग सुरुवातीला एच्छिक स्वरुपात असणार आहे. सराफांना हॉलमार्किंग करणे बंधनकारक नाही. पण ते स्वतःच्या इच्छेनुसार करु शकतात. मात्र पुढील काळात हा नियम अनिवार्य असणार आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हॉलमार्कचा शिक्का असलेले चांदीमुळं ग्राहकांमध्ये अधिक विश्वास निर्माण होईल.
हॉलमार्किंगची प्रक्रिया ही सोन्याच्या दागिन्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हॉलमार्किंगनुसारच असणार आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सकडून लागू करण्यात आलेल्या या नियमांनुसार चांदीची गुणवत्ता आणि शुद्धता ओळखणे ग्राहकांना सोप्पे जाणार आहे. या नियमामुळं चांदीच भेसळ करणारे किंवा फसवणूक करणाऱ्यांवर चाप बसणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण दागिने मिळणार आहेत.
चांदीसाठी असतील 6 नवीन हॉलमार्क
चांदीच्या शुद्धतेची तपासणीसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सने 6 मानक तयार केले आहेत. या मानकच्या माध्यमातून चांदी किती टक्के शुद्ध आहे हे पडताळले जाईल. नवी व्यवस्थाअंतर्गंत ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सने चांदीसाठी एकूण सहा शुद्धतेचे नियम ठरवले आहेत. यात 900,800,835,925,970 आणि 990 असे सहा टप्पे असतील.