#

Advertisement

Saturday, August 30, 2025, August 30, 2025 WIB
Last Updated 2025-08-30T12:21:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्राचे सरकार पाडण्याचा डाव ! आमदार-खासदारांचा आंदोलनात सहभाग

Advertisement

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केला गंभीर आरोप 

मुंबई : मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत. लाखोंच्या संख्येनं मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकल आहे. यावरूनच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी गंभीर आरोप केला आहे. जरांगेंच्या आंदोलनाआडून सरकार पाडण्याचा डाव आहे, असा आरोप हाकेंनी केला आहे. यात अजित पवारांचे आमदार-खासदारही सहभागी असल्याचा आरोप हाकेंनी केला. जरांगेंच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मराठा समाज एकवटलाय. त्यातच आता हाकेंनी जरांगेंवर गंभीर आरोप केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. 
मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांनी सरकार उलथवून लावण्याची धमकी दिली होती. मराठा आरक्षण न दिल्यास राज्यातील सरकार घालवू असा थेट इशारा जरांगेंनी दिला होता. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी मनोज जरांगेंच्या मागणीनुसार आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आमदार अवताडे यांनी विधानसभेचं एक दिवसाचं अधिवेशन घेण्याची लेखी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना केली आहे. यामुळे भाजपचे आमदारही जरांगेंसोबत असल्याचं चित्र दिसून येतंय. तर मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अभिजित पाटील यांनी केली आहे.  बहुजन समाजाला सर्वात पहिले 50 टक्के आरक्षण माझे पंजोबा राजर्षी शाहू महाराजांनी दिलं होतं. असं विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय.. तसंच गरिब मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, जरांगे आणि सरकारने यावर एकत्र बसून तोडगा काढावा, असंही संभाजीराजे म्हणाले.