Advertisement
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
नाशिक : माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून दत्तात्रेय भरणे यांच्याकडे कृषी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांनी कृषिमंत्रीपदाची सर्वात पहिली ऑफर मला दिली होती असा दावा केला आहे.
छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी असा दावा केला की, 'ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये आलो, त्यावेळेला अजितदादांनी अर्थ खाते घेतलं. त्यानंतर बाकीचे खाते माझ्यासमोर ठेवले. तुम्हाला जे खाते पाहिजे आहे ते घ्या. त्यावेळी आम्ही चर्चा केली. तेव्हा अजित पवारांनी माझ्याकडे खूप आग्रह केला होता की, कृषी खातं चांगलं आहे, हे तुम्ही घ्या.'
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, मला कृषी खाते घेण्यासाठी आग्रह करण्यात आला होता. तेव्हा मी म्हणाले की, ग्रामीण भागातील लोकांना संधी दिली पाहिजे. कारण माझे राजकारण हे मुंबईतील आहे. आम्ही शेतकरी प्रश्नावर मागे उभे राहते. पण, त्याची बारीकसारीक माहिती देणारे माणसे ग्रामीण भागात असतात. त्यामुळे आता भरणे मामा या पदाला न्याय देतील असा मला विश्वास आहे.