#

Advertisement

Friday, August 1, 2025, August 01, 2025 WIB
Last Updated 2025-08-01T12:41:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

हिंजवडील ग्रामस्थांचा डायरेक्ट अजित पवारांना इशारा

Advertisement

IT पार्कच्या समस्यांचा विषय कोर्टात

 पुणे : आयटीनगरी हिंजवडीच्या विकास कामांवरून हिंजवडी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मवाळकीची भूमिका घेऊन रस्त्यांविषयी योग्य मार्ग काढावा, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावं लागेल असा इशारा हिंजवडी ग्रामस्थांनी दिला आहे.
हिंजवडीची दुरावस्था झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारा स्वतः लक्ष घालून विकासकामे करून घेत आहेत. सतत वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकड आणि डांगे चौक च्या दिशेने नव्याने होणाऱ्या रस्त्यावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. हिंजवडीतील अंतर्गत रस्ते 36 मीटर ऐवजी 24 मीटर करावेत अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.  याच संदर्भात हिंजवडीत ग्रामसभा घेण्यात आली त्यामध्ये ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली त्यांनी अनेक पर्यायी रस्ते सुद्धा असल्याचं म्हटलय या संदर्भात सोमवारी पी एम आर डी ए कार्यालयात गावकरी एक बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा पीएमआरडीए काय भुमीका घेणार ते पाहावं लागणार आहे. 
हिंजवडी पाहणी दौ-यात पालकमंत्री अजित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. यावेळी अजित पवारांनी आयटी पार्क बंगळुरु, हैदराबादला जात असल्याची कबुली दिली. दादांनी दिलेल्या कबुलीनंतर विरोधकांनी थेट भाजपवर निशाणा साधला. दोन आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी झाली की नाही याची  पाहणी अजित पवारांनी केली.  हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी रस्ते आणि इतर नागरी समस्या बाबत अजित पवार आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. त्यांनी सुचवलेल्या कामांपैकी मागील दोन आठवड्यात हिंजवडीतील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे सुमारे 166 बांधकामे जमीन दोस्त करत प्रशासन देखील कामाला लागल्याचे बघायला मिळत आहे.