Advertisement
मुंबई : पुण्यातील खराडी भागात झालेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केल्यानंतर तिथे प्रांजल खेवलकरला अटक करण्यात आली. प्रांजल खेवलकर न्यायालयीन कोठडीत असून लवकरच जामिनीसाठी अर्ज करण्यात येईल अशी दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यातच आज रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात कुचबुच सुरु झाली आहे.
प्रांजल खेवलकरसाठी जामिनीसाठी अर्जसंदर्भात रोहिणी खडसे म्हणाल्या, आम्ही सगळे कुटुंबीय एकत्र मिळून याबाबत चर्चा करुन निर्णय घेऊ. त्यानंतर जामिनासाठी अर्ज करु. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबद्दल न्यायालयाबाहेर बोलणं चुकीचे आहे. आम्हाला जी काही बाजू मांडायची आहे, ती आम्ही वकिलांमार्फत कोर्टात मांडणार आहोत. मलाही जी काही बाजू मांडायची असेल ती योग्य ठिकाणी आणि योग्यवेळी मी मांडणार आहे. या प्रकरणाची चौकशी एनडीपीएस कलमांच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे.
पक्षसंघटनेतील महत्त्वाच्या मुद्दावर आणि नियुक्तासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली. अधिवेशन चालू असल्याने शरद पवार यांच्याशी चर्चा राहिली होती, शरद पवार भेटीवर असे, स्पष्टीकरण त्यांनी दिले.