Advertisement
राजू शेट्टींनी सांगितलं वनताराला पाठवण्यामागचं षडयंत्र
"पेटा"च्या पदाधिकारी खुशबू गुप्ता यांनी अंबानी उद्योग समूहाकडून मठासाठी दोन कोटी रुपयांची देणगी देतो पण महादेवी हत्तीन वनताराला सुपूर्द करा, अशी विनंती 2020 साली केल्याचं सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी खळबळ उडवून दिली आहे. इतकंच नाही तर पेटा संघटनेच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप नोंदवला आहे.
नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला वनताराला पाठवणं म्हणजे षडयंत्राचा भाग असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.. पेटा आणि वनतारा यांनी संगणमत करून महादेवी हत्तीण नांदणी मठातून घेऊन गेले, असं देखील शेट्टी म्हणाले आहेत. इतकंच नाही तर वनताराला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टनुसार कोणतीही मान्यता नसल्याचे माहिती अधिकारात उपलब्ध झाल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.
पेटा संघटनेच्या कार्यपद्धतीवर राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेले सवाल गंभीर आहेत. तर दुसरीकडे अंबानी उद्योग समूहाने उभा केलेला वनतारेला वाईल्ड प्रोटेक्शन एक्टनुसार परवानगी नाही. जर त्यांना अशी परवानगी मिळाले असेल तर त्याचा खुलासा वनताराने करावा अशी मागणी करत राजू शेट्टीने वनताराला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.