#

Advertisement

Tuesday, August 26, 2025, August 26, 2025 WIB
Last Updated 2025-08-26T15:31:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ट्रम यांनी चार वेळा फोन केला मोदी बाललेच नाही !

Advertisement

दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफचा वाद सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळेस फोन केले आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधला नाही. याबाबत जर्मनीच्या एका वृत्तपत्रानं दावा केला आहे. यावरून अमेरिका आणि भारतात सर्व काही सुरळीत सुरू नसल्याचा दावाही या वृत्तपत्राकडून करण्यात आला आहे.
जर्मनीच्या एका प्रसिद्ध वृत्तपत्राकडून असा दावा करण्यात आला आहे की, टॅरिफचा वाद सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना फोन करून चारवेळेस बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांच्याशी एकदाही बोलले नाहीयेत. मात्र अद्याप अमेरिका आणि भारत सरकारकडून या वृत्ताला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.
दरम्यान ही पहिली वेळ नाहीये, तर यापूर्वी देखील पाकिस्तानसोबत भारताचा संघर्ष निर्माण झाल्यानंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपती यांनी मोदींसोबत फोनवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पंतप्रधान मोदी हे त्यांच्याशी देखील बोलले नव्हते, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत माहिती दिली होती. युद्धविरामाच्या एक दिवस आधी अमेरिकेचे उपराष्ट्रपती यांनी तीन ते चार वेळेस फोन करून आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र मी बैठकांमध्ये व्यस्त होतो, त्यामुळे बोलणं होऊ शकलं नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.