Advertisement
पुणे : पुण्यातील पाचही मानाचे गणपती विराजमान झाले असून पुढील 10 दिवस राज्याची संस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरामध्ये गणेशोत्सवाची धूम असणार आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं दर्शन घेण्यासाठी देशोविदेशातून गणेशभक्त पुण्यात येतात. विशेष म्हणजे मानाचे गणपती आणि छत्रपती शिवराय, याचा अनोखा ऐतिहासिक संबंध आहे, कसबा गणपतीच्या मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी 'द पोस्टमन' या मराठी पॉडकास्टच्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
मानाचे पाच गणपती कसे ठरले यासंदर्भात शेटे यांनी सांगितलं, ज्यावेळेला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि सार्वजनिक मुरवणुकीचा विषय आला त्यावेळेला रे मार्केट म्हणजेच आताचा फुले मार्केट म्हणजेच मंडईमध्ये यावेळेला जी काही चर्चा झाली त्यावेळी तत्कालीन जो काही ब्रह्मवृंद होता, लोकमान्य होते. खाजगीवाले होते, ऊसाहेब रंगारी होते. घोटवडेकर होते. यांनी मिळवून ठरवलं होतं की मिरवणुकीत अग्रक्रम, पहिला नाही अग्र! असं उत्तर दिलं होते. पहिला शब्द आपल्याला आता कळतो, त्यावेळेस अग्रक्रम हा ग्रामदैवत कसबा गणपती असल्यामुळं त्याला आणि ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी असल्यामुळे त्याला दुसरा मान दिला गेला. त्या क्रमाची सक्षम व्यवस्था 132 वर्ष आतापर्यंत एकगम अव्याहत चालू आहे. बालराजे शिवाजी महाराज आणि आऊसाहेब ज्यावेळेस पुण्यामध्ये आलेल्या त्यावेळेला या गणपतीची पुन:प्राणप्रतिष्ठापना केली. ग्रामदैवतेचा दर्जा त्यांनी दिलेला आहे. हा गणपती इथं असतो म्हणून पहिला मान हा कसबा गणपतीला दिलेला आहे. हा ग्रामदैवताचा छत्रती शिवाजी महाराजांनी दिलेला हा मान आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सुरुवातीला, मंडई (फुले मार्केट) येथे झालेल्या चर्चेत लोकमान्य टिळक, भाऊसाहेब रंगारी, खाजगीवाले, आणि घोटवडेकर यांनी एकमताने मिरवणुकीचा क्रम ठरवला. कसबा गणपतीला ग्रामदैवत म्हणून अग्रक्रम (प्रथम स्थान) आणि तांबडी जोगेश्वरीला दुसरे स्थान देण्यात आले, शेटे असेही श्रीकांत शेटे यांनी स्पष्ट केले.