#

Advertisement

Wednesday, August 27, 2025, August 27, 2025 WIB
Last Updated 2025-08-27T12:01:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोनं पुन्हा एकदा लाखापार !

Advertisement

पुणे :  सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली असून सोनं लाखापार पोहोचलं आहे. गणेशोत्सवाआधी सोन्याचे दर घसरले होते. मात्र आता. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात 380 रुपयांची वाढ झाली असून 1,02,440 रुपयांवर स्थिरावले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 350 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 93,900 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 280 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 76,830रुपयांवर पोहोचलं आहे. सोन्याच्या किंमती जागतिक बाजारातील चढ-उतारांनुसार आणि स्थानिक मागणीनुसार दररोज अनेक वेळा बदलू शकतात. MCX वर दररोज सकाळी आणि संध्याकाळी किंमती अपडेट होतात.

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 93,900 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 1,02,440 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 76,830 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,390 रुपये

1 ग्रॅम 24 कॅरेट 10,244 रुपये

1 ग्रॅम 18 कॅरेट 7,683 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 75, 120 रुपये

8 ग्रॅम 24 कॅरेट 81, 952 रुपये

8 ग्रॅम 18 कॅरेट 61, 464 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 93,550 रुपये

24 कॅरेट- 1,02,060रुपये

18 कॅरेट- 76,550 रुपये

सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? 

  • सोन्याची शुद्धता तपासा (हॉलमार्क किंवा स्टॅम्प).  
  • विश्वासार्ह ज्वेलरकडून खरेदी करा.  
  • मेकिंग चार्जेस आणि GST (3% सोन्यावर आणि 5% मेकिंग चार्जेसवर) विचारात घ्या.  
  • खरेदीचे बिल आणि शुद्धतेचे प्रमाणपत्र घ्या.