Advertisement
पुणे : महापालिका स्वबळावर लढण्याचा इशारा अजित पवारांनी दिला आहे. पुणे मनपात भाजप राष्ट्रवादीला सोबत घेण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्यामुळे अजित पवारांनीही आपल्या शिलेदारांना स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
अजित पवारांनी पुण्यात माजी नगरसेवकांच्या बैठकीत मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीच्या सर्व माजी नगरसेवकांच्या बैठकीत अजित पवारांनी स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. प्रभाग रचनाही भाजपच्याच सोईची असल्याने राष्ट्रवादी नगरसेवकांच्या तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज पक्ष नगरसेवकांची बैठक बोलावली होती. सुचना हरकतीत जे काही बदल होतील ते होतील, पण स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असं अजित पवारांनी सांगितलं आहे.