Advertisement
जुन्नर : फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे. शिकायला पाहिजे. गोरगरीब मराठ्यांची नाराजी अंगावर घेतली की, पुढच्या काळात काय होईल?. बहुमताची सत्ता मराठ्यांशिवाय आली नाही. मराठ्यांच्या नाराजीची लाट तुमच्याविरोधात गेली, तर येणारे दिवस तुमचे राजकीय करिअर बरबाद करणारे असतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईला यायला निघाले आहेत. काल त्यांनी जुन्नरमध्ये मुक्काम केला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आझाद मैदानातील आंदोलकांच्या संख्येवरही मनोज जरांगे पाटील म्हणाले की, फडणवीस साहेब कोणाला थांबवणारं नाहीत. गोरगरीबांच्या वेदनाचं सन्मान करतील अशी आशा आहे. एकदिवसाची परवानगी दिली ही गोरगरीब मराठ्यांची चेष्टा आहे. अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरच झटकून दुसऱ्याच्या अंगारवर जाळ टाकणं आहे. महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सिद्ध करायचं आहे की, मी परवानगी दिली, माझी काय चूक आहे. पण फडणवीस साहेब यातून दुसरा असा संदेश जातो की, तुम्ही न्यायालय-न्यायालय म्हणत होते, पण परवानग्या तुमच्याकडेच होत्या. तुम्ही जर एक दिवसाची परवानगी देऊ शकता, तर उपोषणाच्या मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. आजही विनंती करुन सांगतो की, योग्य संधी आहे फडणवीस साहेब संधीचं सोनं करण्याची. गोरगरीब मराठ्यांची मनं जिंकण्याची. हेच मराठे गुलाल टाकून मरपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचे, तुमचे उपकार विसरणार नाहीत. तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही, तुम्ही आमचे वैरी, शत्रू नाहीत, असं मनोज जरांगे पाटील बोलले.
