Advertisement
NASA च्या हाती मोठे पुरावे
दिल्ली : नासा अर्थात अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या संशोधकांनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप नावाच्या अतिशय कार्यक्षम अशा दुर्बिणीतून K2-18b नावाच्या एका दुसऱ्या आकाशगंगेच्या वातावरणीय लहरींमध्ये काही रायायनिक बदल पाहिले. साधारण 124 प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या या विश्वातून मिळालेली ही चिन्हं बऱ्याच गोष्टी सूचित करत आहेत.
दुर्बिणीनं केलेल्या निरीक्षणानुसार dimethyl sulphide (DMS) आणि dimethyl disulphide (DMDS) हे दोन असे वायू आहेत ज्यांची निर्मिती सजीव मायक्रोब algae पासून होते. हेच वायू त्या ग्रहावरही आढळले. K2-18b हा पृथ्वीपेक्षा अडीचपट मोठा ग्रह असून, त्या ग्रहाचं वेगळ्या सूर्यमालेतील स्थान पाहता तिथं द्रव रुपात पाण्याचे साठे असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं अभ्यासकांचं मत. या ग्रहावरील वायूशी झालेला संपर्क पाहता तिथं सजीवसृष्टीचा वावर आणि प्रचंड महासागरही असू शकतात.
'हा एक अतिशय सबळ पुरावा असून, तिथं जीवसृष्टीचं अस्तित्वं असूही शकतं. मी वास्तवात असं म्हणू शकतो की आपण पुढील एक ते दोन वर्षात याबाबतचा निष्कर्षही काढू शकतो', अशी महत्त्वपूर्ण माहिती केम्ब्रिज विद्यापीठाच्या निक्कू मधुसूदन या astrophysicist यांनी दिली, ज्यांनी या निरीक्षणाचं नेतृत्त्वं केलं. आश्चर्याची बाब म्हणजे वरील वायुंच्या हालचाली त्या ग्रहावर पृथ्वीपेक्षा कैक पटींनी जास्त असून त्याचमुळं एलियनचं अस्तित्वं आणि जीवसृष्टीबाबतचे तर्क खरे ठरू शकतात.