#

Advertisement

Monday, August 25, 2025, August 25, 2025 WIB
Last Updated 2025-08-25T13:06:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

धाराशीवमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार

Advertisement

धाराशीव :  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून महायुतीला कसे थोपवता येईल, यासाठी डावपेच आखले जात आहेत. असे असतानाच  महाविकास आघाडीत पहिली वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धाराशीवमध्ये काँग्रेसने यावेळची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची भूमिका घेतली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशीव जिल्हा काँग्रेसची उमरगा येथे नुकताच बैठक पार पडली. या बैठकीला धाराशीव जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष धीरज पाटील हे उपस्थित होते. त्यांच्याच उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना बळकटी मिळावी तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीसाठी ही जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली होती. याच बैठकीत एकला चलो रे, चा संकेत देण्यात आला आहे. आता धाराशीवमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने या भूमिकेचा वणवा अन्य जिल्ह्यांतही जातो का? तसेच ही शक्यता खरी ठरली तर राज्यभरात महाविकास आघाडीच्या घटकपक्षांत दुफळी निर्माण होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.  महाविकास आघाडीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्ष नेमकी काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागलेले आहे.