#

Advertisement

Tuesday, August 12, 2025, August 12, 2025 WIB
Last Updated 2025-08-12T14:16:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह ७ जणांची निर्दोष मुक्तता

Advertisement

निवडणुकीत पैसे वाटल्याचा करण्यात आलेला आरोप 

करमाळा : करमाळा माढा विधानसभेच्या निवडणूक प्रचारा दरम्यान २०१४ साली मौजे भाळवणी शिवारातील गावडे यांचे साई धाब्याच्या समोर ६ इसम संजयमामा शिंदे यांचे प्रचार साहित्य मतदार याद्या व त्यांचे मुखवटे घेऊन जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाचा भंग करून मतदारांना पैशाचे आमिष दाखवून वाटल्याचा आरोप प्रकरणी सरकारी पक्षाला आरोपीविरुद्धचा खटला संशयाच्या पलीकडे जाऊन सिद्ध करता आला नाही. त्यामुळे सदर आरोपींना संशयाचा फायदा देऊन मा.न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एड. सचिन लुनावत यांनी तर आरोपी पक्षातर्फे एड. प्रमोद जाधव व एड. सुनील रोकडे यांनी कामकाज पाहिले‌ सदर निकालानंतर करमाळा तालुक्यातील संजयमामा शिंदे गटाच्या कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
करमाळा माढा विधानसभेच्या निवडणूक प्रचारा दरम्यान २०१४ साली गस्तीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल कुमार गोडसे व पोलीस हवालदार मुजावर यांच्या म्हणण्यानुसार पैसे वाटप केले जात असल्याचा प्रकार आढळून आला होता. सदर इसमांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील तवेरा गाडी व दोन मोटरसायकली तसेच निवडणूक प्रचार साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. सदरचा प्रकार हा संजयमामा शिंदे यांच्या सांगण्यावरून करत असले बाबत पोलिसांनी फिर्यादीत नमूद करण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास हा ए.पी.आय ए. एस. माने यांनी करून सर्व आरोपीविरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी माननीय दिवाणी न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांच्यासमोर झाली. सदर सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.
दरम्यान आरोपीचे वकील एड. प्रमोद जाधव यांनी माननीय न्यायालयापुढे सदर आरोपींना गैरमार्गाने व राजकीय दबावापोटी पोलिसांनी गुंतविलेले आहे. सदर घटनेशी यातील कोणत्याही आरोपीचा संबंध नाही. यातील संजयमामा शिंदे हे सदरवेळी करमाळा माढा विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा राहिलेले होते. केवळ त्यांची राजकीय बदनामी करून त्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रस्तुतचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे म्हणणे न्यायालयासमोर मांडले.