Advertisement
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते उद्धव ठाकरे गुरुवारी (7 ऑगस्ट) दिल्लीत होते. त्याचदिवशी ठकरेंचा सहकारी पक्ष असलेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीची जोरदार चर्चा सध्या दिल्लीच्या वर्तुळात सुरु आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपूर्ण कुटुंबीयांसमोर शिंदेंनी भेट घेतली तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सर्व खासदारांसमोर भेट घेतली या भेटीदरम्यान वेगळी चर्चा शिंदेंनी करत राज्यातील अस्वस्थता बोलून दाखवल्याचं समजतं. या घडामोडी घडत असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील दिल्ली दौऱ्यावर होते. ठाकरे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत यामुळे नेमकी अचूक वेळ सुप्रिया सुळेंनी सादली का अशी चर्चा रंगली . दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक राहुल गांधी यांच्याकडे होत असतानाच सुप्रिया सुळे यांनी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत नेमका काय सूचक इशारा केलाय याची चर्चा आहे.