#

Advertisement

Wednesday, August 6, 2025, August 06, 2025 WIB
Last Updated 2025-08-06T12:05:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवारांचे प्रमुख शिलेदार उत्तम जानकर शिवसेनेच्या वाटेवर?

Advertisement

सोलापूर : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माळशिरसचे नेते आणि माजी आमदार हनुमंत डोळस यांचे सुपुत्र संकल्प डोळस यांनी केलं आहे, या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.उत्तम जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख नेते आहेत, ईव्हीएमच्या मुद्द्यावर त्यांनी मोठं आंदोलन देखील उभारलं होतं.
उत्तम जानकर यांनी सोलापूरमध्ये आयोजित एका मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं होतं. कर्णानंतर एकनाथ शिंदे हे दुसरे दानी व्यक्ती आहेत. आपण 40 वर्ष राजकारणात आहोत, दुसऱ्या पक्षात आहोत, पण शिंदेंसारखा दिलदार माणूस आपण पाहिला नाही, असं वक्तव्य जानकर यांनी केलं होतं. दरम्यान जानकर यांच्या या वक्तव्यानंतर आता  माजी आमदार हनुमंत डोळस यांचे सुपुत्र संकल्प डोळस यांनी  जानकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जानकर हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  डोळस यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.