Advertisement
पुणे : भारतीय रेल्वे किती मायलेज देते. एक लिटर डिझेलमध्ये ट्रेन किती किलोमीटर चालते. हे फार कमी लोकांना माहित असेल. भारतीय ट्रेनचं मायलेज सुद्धा एक सारखं नसतं. ट्रेन इंजिनचे मायलेज त्याच्या पॉवरवर, त्यावर वाहून नेणाऱ्या भारावर, ती कोणत्या मार्गावर धावते आणि त्या मार्गावरील वाहतुकीवर अवलंबून असते. ट्रेनच्या मायलेजमध्ये सर्वात मोठा घटक म्हणजे ट्रेनचा वेग आणि ती प्लॅटफॉर्मवर किती वेळा थांबते, यावरही अवलंबून असते.
पॅसेंजर ट्रेन : 12 कोचच्या प्रवासी ट्रेनमध्ये 1 लिटर डिझेल भरलं आणि ती सामान्य वेगाने धावली तर ती एका लिटरमध्ये 0.16 किलोमीटर म्हणजेच 160 मीटर धावेल. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, 12 डबे असलेली प्रवासी ट्रेन 6 लिटर इंधनात एक किलोमीटरचा प्रवास करु शकते.
एक्सप्रेस ट्रेन : 12 कोच असलेल्या एक्सप्रेस ट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास 1 लिटर डिझेलमध्ये ही ट्रेन 0.2 किमी म्हणजेच 200 मीटर पर्यंत धावू शकेल. एक्सप्रेस ट्रेनचे इंजिन 4.5 लिटर इंधनामध्ये जवळपास एक किलोमीटर पर्यंत चालते.
सुपरफास्ट ट्रेन : सुपरफास्ट रेल्वे ट्रेन एक लिटर डिझेलमध्ये 230 मीटर प्रवास करतात. तर सामान्य प्रवासी गाड्या 1 लिटर डिझेलमध्ये 180 ते 200 मीटर अंतर पार करतात.
कमी स्टॉपेज, जास्त मायलेज : सुपरफास्ट गाड्यांचे थांबे कमी असतात, त्यामुळे त्यांचा वेग जास्त असतो. यामुळेच या गाड्या जास्त मायलेज देतात. वारंवार थांबल्याने आणि नंतर सुरू झाल्यामुळे इंजिनला जास्त इंधन खर्च करावं लागतं. थांबे जर कमी असतील तर इंधन कमी खर्च होतं.
