Advertisement
सोलापूर : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 2 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख 22 हजार 881 शेतकरी बाधित झाले आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालनुसार 1 ते 22 सप्टेंबरपर्यंत तब्बल 1 लाख 95 हजार 631 हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. तर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील तब्बल 729 गावांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुराची परिस्थिती पाहता विभाग प्रमुखांना केंद्र न सोडण्याचे आदेश दिले आहेत. पूरस्थितीत लोकांना मदतकार्य करण्यासाठी कोणत्याही विभागाचे खाते प्रमुख आणि कर्मचारी मुख्यालय सोडू नये असा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे.
सप्टेंबर महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 6 लोकांचा मृत्यू झाला. तसंच 49 जनावरे, 15 हजार 41 कोंबड्या देखील दगावल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 541 घराची पडझड झाली असून, 4058 कुटुंबाच्या घरात शिरलं पाणी शिरलं आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्राथमिक अहवालतून माहिती, अंतिम आकडेवारीत नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागांचा दौरा करण्याचा आदेश दिला आहे. आजपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करा असं कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री यांनी सर्व मंत्र्यांना आदेश दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता मुख्यमंत्रीही मैदानात उतरणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रीही पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत.
