Advertisement
मुंबई : शिवसेना भवन येथे शिवसेना ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांची बैठक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली, या बैठकीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मनसेसोबतच्या युतीचा निर्णय लवकरच घेऊ, मात्र तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ठाकरे सेनेच्या शाखा प्रमुखांची बैठक शिवसेना भवनामध्ये पार पडली, या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केलं. मनसेसोबतच्या युतीचा निर्णय लवकरच घेऊ, मात्र तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, असं उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये म्हटलं आहे. भाजप नेते आणि मुख्यमंत्री आपल्यावरच टीका का करतायेत? हे लक्षात घ्या. निवडणुकीला फक्त शंभर दिवसच राहिले आहेत, त्यामुळे जोमानं कामाला लागा. विरोधकांना आपल्याला या निवडणुकीत गाडायचं आहे, जे आपल्याला सोडून गेले आहेत, ते परत पक्षात आले तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही. भाजपनं आपला पक्ष आणि चिन्ह चोरलं आहे, असं या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
