Advertisement
मुंबई : राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या आरक्षणाबाबतच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. याबाबत सरकारने जीआर देखील काढला आहे. मात्र, त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये आता ओबीसी नेते देखील आक्रमक झाले आहेत. ओबीसींसाठी उपसमिती नेमण्यात आली आहे.
मराठा आरक्षण उपसमितीपाठोपाठ आता ओबीसी उपसमितीवरही भाजपचाच वरचष्मा असल्याचं समोर आल आहे. ओबीसी आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी महसूलमंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, ओबीसी नेते अशी ओळख असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांना उपसमितीचं सदस्य करण्यात आल आहे. 2020मध्ये छगन भुजबळ ज्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते त्याच भुजबळांना मंत्रिमंडळ उपसमितीत सदस्यपद देण्यात आल आहे. या मंत्रिमंडळ उपसमितीचं अध्यक्षपद भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे देण्यात आल आहे.
