#

Advertisement

Monday, September 29, 2025, September 29, 2025 WIB
Last Updated 2025-09-29T12:49:48Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लक्ष्मण हाके चळवळीतून बाहेर पडणार?

Advertisement

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात आरक्षणाचा मुद्दा गाजत असून राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार जाहीर केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शविला असून त्यांना स्वंतत्र्य आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. त्यात लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. ज्यात त्यांनी मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर आभार मानतो, असं म्हटलं आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके चळवळीतून बाहेर पडणार अशी चर्चा रंगली आहे.
सोशल मीडिया प्लेटफॉर्म एफबीवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लक्ष्मण हाके यांनी लिहिलंय की, मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून, मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे, मी बॅनर छापू शकत नाही, गाडीला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही, हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत, उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, मला पाठिंबा देत राहिलात, मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत, मी ओबीसी च्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहाना जोडत गेलो, लाखो माणसं जोडली पण शत्रूची संख्या सुद्धा वाढत गेली, हल्ले झाले, झेलले, पण आत्ता सहन होत नाही, उद्या दैत्यानांदूर ता पाथर्डी जि अहिल्यानगर च्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन, मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो – लक्ष्मण हाके’  त्यामुळे आता लक्ष्मण हाके उद्या नेमकी काय भूमिका घेतात याकडे राजकारणातील नेत्यांपासून सर्वांचं लक्ष लागून आहे.