Advertisement
धाराशिव येथील मातंग समाजाच्या वतीने इशारा
धाराशिव : येथील मातंग समाजाच्या वतीने धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. एन.डी.टी.व्ही. प्रसार माध्यमावर झालेल्या अनुसूचित जाती अ ब क ड वर्गीकरण या संदर्भातील चर्चेवरून प्रा. डॉ.लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर वैयक्तिक टीका केली आणि इतर लोकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून अपशब्द वापरून बौद्ध आणि मातंग समाज या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा व्यक्तींवर तत्काळ गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यतः महाराष्ट्रातील मातंग समाज महाराष्ट्रभर उग्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा धाराशिव जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.
दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी मातंग समाजाच्या वतीने या समाजकंटकावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी मातंग समाजाच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी ईश्वर क्षीरसागर, बालाजी गायकवाड, प्रा. डॉ. मारुती लोंढे, संतोष मोरे, योगेश येडाळे, मीना धावारे, रेश्मा शिंदे, खंडू लोंढे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
