#

Advertisement

Saturday, October 4, 2025, October 04, 2025 WIB
Last Updated 2025-10-04T11:39:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नाशिकमधील 12 पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

Advertisement

पोलीस दलात खळबळ : आयुक्तांनी काढला आदेश 

नाशिक : पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकूण 12 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून, यामध्ये सात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदलीमागे काही दिवसांपूर्वी तीन आमदारांनी घेतलेली भेट कारणीभूत आहे. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी आता पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर आले आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर त्यांची तडकाफकडी बदली करण्यात आली आहे. 

बदली करण्यात आलेले पोलीस अधिकारी  

1) पोलीस निरीक्षक मधुकर शिवाजी कड -  अंबड पोलीस ठाणे, नाशिक शहर

2) पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग नवलसिंग राजपूत -  गंगापूर पोलीस ठाणे, नाशिक शहर

3) पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंडे - अंबड पोलीस ठाणे, नाशिक शहर

4) पोलीस निरीक्षक प्रकाश आत्माराम अहिरे - भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर

5) पोलीस निरीक्षक उमेश नानाजी पाटील - सायबर पोलीस ठाणे, नाशिक शहर

6) पोलीस निरीक्षक संतोष बबनराव नरुटे - मुंबईनाका पोलीस ठाणे, नाशिक शहर

7) पोलीस निरीक्षक रणजित पंडीत नलवडे - सातपूर पोलीस ठाणे, नाशिक शहर

8) पोलीस निरीक्षक संजय मारुती पिसे - आडगांव पोलीस ठाणे, नाशिक शहर

9) पोलीस निरीक्षक विश्वास रोहिदास पाटील - एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी, नाशिक शहर

10) म पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे - इंदिरानगर पोलीस ठाणे, नाशिक शहर

11) पोलीस निरीक्षक तुषार मुरलीधर अढावु - शहर वाहतूक शाखा, युनिट क्रमांक 1,  नाशिक शहर

12) पोलीस निरीक्षक रियाज ऐनुद्दीन शेख - सातपूर युनिट, शहर वाहतूक शाखा, नाशिक शहर