#

Advertisement

Saturday, October 4, 2025, October 04, 2025 WIB
Last Updated 2025-10-04T11:50:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

तिला म्हणाव तू असशील गाैतमी पाटील…! चंद्रकांत पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल

Advertisement

चंद्रकांत पाटलांचा थेट फोन,  गाैतमी पाटीलला अटक करण्याची मागणी

पुणे : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी थेट डीपीसींना फोन लावला. फक्त फोनच नाही तर गाैतमी पाटीलला उचलायचे की नाही? असा थेट सवालही केला.  मात्र, गाैतमी पाटील हिच्यावर चंद्रकांत पाटील चांगलीच भडकताना दिसत आहेत. हेच नाही तर ती असेल गाैतमी पाटील पण तिने मदत करायला हवी ना? असेही त्यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या फोननंतर पुणे पोलिसांनी एक नोटीस गाैतमी पाटील हिला पाठवली आहे.
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला गाैतमी पाटीलच्या भरधाव कारने धडक दिली. ज्यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. ज्या कारने रिक्षाचालकाला उडवले, ती कार गाैतमी पाटीलच्या नावावर आहे. वडगाव बुद्रुक येथे मागच्या बाजूने गाैतमीच्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यानंतर रिक्षाचे मोठे नुकसान झाले आणि दोन प्रवासी आणि रिक्षाचालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाले. याप्रकरणात गुन्हा दाखल केला असून ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी गाडीमध्ये गाैतमी पाटील नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कुटुंबियांनी आरोप केला की, आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवले जात नाही. गाडीमध्ये कोण होते, हे सांगितले जात नाहीये. गाैतमी पाटील हिला अटक करा अशी मागणी आता रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केली. यासोबतच त्यांनी पोलिसांवरही काही गंभीर आरोप केले.
चंद्रकांत पाटलांच्या भेटीसाठी रिक्षाचालकाची मुलगी पोहोचली. यादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना फोन करून म्हटले की, गाैतमी पाटीलला उचलायचे की नाही? ती गाडी कुणाची तरी आहे ना..रिक्षावाला गंभीर आहे. तिला म्हणाव तू असशील गाैतमी पाटील वगैरे पण त्यांचा खर्च तरी कर म्हणाव. ठाकरेंच्या शिवसेनेने देखील गंभीर आरोप करत पोलिस स्टेशनबाहेर आंदोलन केले. गाैतमी पाटीलला अटक करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.