#

Advertisement

Saturday, October 4, 2025, October 04, 2025 WIB
Last Updated 2025-10-04T11:29:55Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

साखर कारखान्यात CNG गॅस निर्मितीचा पहिला प्रयोग महाराष्ट्रात

Advertisement

कोपरगावच्या संजीवनी साखर कारखान्याने सुरू केला प्रकल्प

अहिल्यानगर : भारतात साखर कारखान्यात CNG गॅस निर्मितीचा पहिला प्रयोग महाराष्ट्रात सुरु करण्यात आला आहे. सहकाराची पंढरी म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, आता त्यात एक नविन भर पडणार असुन देशातील सहकार क्षेत्रातील पहिला सीएनजी बायोगॅस प्रकल्प व पोटॅश प्रकल्प कोपरगावच्या संजीवनी साखर कारखान्याने सुरू केला आहे.  या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोपरगावात येणार आहे.
भारतातातील पहिला CNG गॅस निर्मिती प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात सुरु करण्यात आला  आहे. अन्नदाता ते उर्जादाता या संकल्पनेतून 50 कोटी रुपये खर्चून साखर कारखान्यात सीएनजी प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून दररोज 12 टन सीएनजी निर्मिती केली जाणार असून पेट्रोलियम कंपन्यांना गॅस विक्री केली जाणार असल्याने कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. साखर कारखान्याचे वाया जाणारे सांडपाणी आणि डिस्लेरी स्पेंड यातून मिथेन काढून सीएनजी तयार केला जाणार आहे. दरम्यान कोपरगाव येथे उभारण्यात आलेल्या सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर प्रत्यक्षात या प्रकल्पातून सीएनजी निर्मिती करून विक्रीसाठी सुरवात केली जाणार आहे.