#

Advertisement

Wednesday, October 1, 2025, October 01, 2025 WIB
Last Updated 2025-10-01T18:02:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

Advertisement

अनुसूचित जातीच्या उप-वर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक

पंढरपूर : अनुसूचित जाती (SC) मधील आरक्षणाचे 'अ ब क ड' (ABCD) वर्गीकरण महाराष्ट्रात लागू करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाने पंढरपूर येथे माजी मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत समर्थन दर्शवले. ढोबळे समर्थकांनी ही मागणी लवकरात लवकर राज्यात लागू व्हावी यासाठी राज्यभर आंदोलन सुरू असल्याची माहिती दिली. प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांनी उप-वर्गीकरण लागू करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी हा दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी आंदोलकांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र मध्ये अनुसूचित जातीमध्ये अ ब क ड वर्गीकरण हे लागू झालं पाहिजे. यासाठी समस्त मातंग समाज संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे. यावेळी बोलताना आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उप-वर्गीकरण लागू करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. सरन्यायाधीश भूषण गवई यांची 'अ ब क ड' वर्गीकरण लागू करण्याबाबतच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आरक्षण लागू करण्यासाठी भूमिका घेतली आहे, त्याचेही आम्ही स्वागत करतो, असे समर्थकांनी सांगितले.
प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उप-वर्गीकरणाच्या भूमिकेला काही समाजकंठकांनी विरोध केला होता, अशा विरोधकांना उत्तर देण्यासाठी आणि आपली भूमिका अधिक ठामपणे मांडण्यासाठी आज त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांची 'अ ब क ड' आरक्षण लागू करण्याबाबतची जी भूमिका होती, तिला काही समाजकंठकांनी विरोध केला होता. त्यांना उत्तर म्हणून आज आम्ही त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत आहोत, असे आंदोलकांनी स्पष्ट केले. अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी हा लढा यापुढेही असाच सुरू राहील, असा निर्धारही मातंग समाजाने यावेळी व्यक्त केला.