#

Advertisement

Saturday, October 11, 2025, October 11, 2025 WIB
Last Updated 2025-10-11T12:37:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

न्यायाधीशावर बूट भिरकावणे अतिशय दुर्दैवी : लक्ष्मणराव ढोबळे

Advertisement

सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याचा मंगळवेढ्यात निषेध

मंगळवेढा : देशात महत्वाचा स्तंभ म्हणून न्यायालये आहेत, अशा परिस्थितीत आपल्याला देशात लोकशाही आहे असे वाटते. परंतु, कामकाज करताना त्याच ठिकाणी एक वकील सर्वोच्च न्यायाधीशाला बूट भिरकावतो हे निषेधार्ह आहे. हे प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. यावर एक परिषद घेऊन सर्वांनी आपली भूमिका मांडली पाहिजे, अशी भावना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने चप्पल किंवा कागदाचा गुंडाळा फेकण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला लोकशाहीच्या स्तंभाला खिळखिळ करणारा आहे. त्यामुळे दामाजी चौकात या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी लक्ष्मणराव ढोबळे बोलत होते.
या निषेध सभेत काँग्रेस माजी जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पवार, काँग्रेस मतदरसंघ अध्यक्ष मारुती वाकडे, मनोज माळी, बबन धावरे, स्मिता अवघडे, ज्ञानेश्वर कोंडूभैरी, संतोष आसवे, जमीर इनामदार, चिदानंद माळी, राजाराम दत्तू आदी उपस्थित होते.