#

Advertisement

Friday, October 10, 2025, October 10, 2025 WIB
Last Updated 2025-10-10T13:24:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमदाराला हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न

Advertisement

दहा लाख रुपयांची केली मागणी

कोल्हापुर : चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना मोबाइलद्वारे अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अश्लील मेसेज करुन शिवाजी पाटलांकडे दहा लाख रुपयांची मागणी एका महिलेने केली. पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
आमदार पाटील यांना ही अनोळखी महिला गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून फोन करत होती. तिने सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंग केल्यानंतर त्यांना फोन करून मैत्रीची इच्छा व्यक्त केली. संवाद वाढल्यावर काही तरुणींचे अश्लील फोटो पाठविले. पुढे त्यांच्याकडे तिने कधी एक लाख, कधी दोन लाख तर कधी पाच लाख रुपये अशी एकूण दहा लाखांची मागणी केली. 
काही दिवसांनंतर आमदारांनी त्या महिलेचा त्रास वाढल्याने तिला ब्लॉक केले. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिने दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधत अश्लील छायाचित्रे आणि संदेश पाठवण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीन आणि राजकीय प्रतिमा मलिन करीन, अशी धमकीही तिने दिली. पैशांची मागणी वाढल्यानंतर पाटील यांनी 8 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात सायबर हनी ट्रॅपचा हा प्रकार असून, आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.