#

Advertisement

Saturday, October 11, 2025, October 11, 2025 WIB
Last Updated 2025-10-11T12:54:33Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पुतण्याच्या मदतीला अजितकाका आले धावून

Advertisement

घायवळसोबतच्या फोटोप्रकरणी रोहित पवारांची केली पाठराखण 

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा रोहित पवारांची पाठराखण केली आहे. गुंड सचिन घायवाळसोबत रोहित पवारांचा फोटो समोर आला होता. याबाबत बोलताना अजितदादांनी पुतण्याची पाठराखण केली. कुणासोबत फोटो आला म्हणजे लगेच दोषी होत नसतो असं अजितदादांनी म्हटलं आहे.
गुंड सचिन घायवळसोबतचा रोहित पवारांचा फोटो समोर आल्यानं रोहित पवार थोडेसे अडचणीत आलेआहेत. भाजपनं तर निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्याशी रोहित पवारांचे मैत्रीचे संबंध असल्याचा आरोप केला आहे. भाजपनं रोहित पवारांवर आरोपांच्या फैरी झाडलेल्या असताना अजितदादा पुतण्याच्या मदतीचा धावून आले आहेत. फोटो असला म्हणूजे रोहित पवारांचे घायवळशी संबंध आहेत असं होत नाही असं अजितदादांनी सांगितल. भाजप मात्र अजूनही त्यांच्या आरोपांवर ठाम आहे. सचिन घायवळ हा रोहित पवारांचा कार्यकर्ता असल्याचा दावा भाजपनं केला आहे.
दरम्यान, अजित पवार आणि रोहित पवार या काका-पुतण्यांचा राजकीय मार्ग वेगवेगळा झाला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी एकमेकांना पाण्यात पाहणारे हे काकापुतण्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमालीचं सौख्य पाहायला मिळत आहे. आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकावल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी अजितदादा वादात सापडले होते. त्यावेळी अजितदादांच्या पक्षाआधी रोहित पवारांनी अजितदादांची पाठराखण केली होती.