Advertisement
राज्य सरकार खेळी करीत असल्याची टीका
सोलापूर : राज्यातील शेतकऱ्यांवर पावसामुळे मोठं संकट आले आहे. मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झाले हे. त्यातच, खरीप हंगाम २०२५ साठी अत्यंत आवश्यक असलेली ई-पीक पाहणी नोंदणी करताना शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. आता ही सतत सर्व्हर डाऊन होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करता येत नाही, त्यामुळे पीक विमा, अनुदान आणि नुकसान भरपाईसारख्या योजनांच्या लाभांपासून शेतकरी वंचित राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू नये यासाठीच राज्य सरकार ही खेळी करीत असल्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी म्हटले आहे.
माजी मंत्री म्हणा;ढोबळे म्हणाले की, सर्व्हर डाउन असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई रखडली आहे. विशेषतः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करता येत नसल्याने त्यांना मदत मिळत नाही, सोलापूरसह पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांबाबत हे घडले आहे. सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी आणि KYC पूर्ण होत नाही, त्यामुळे भरपाईची प्रक्रिया थांबली आहे. पंढरपूर तालुक्यातील सुमारे २६०० शेतकऱ्यांना KYC झाली नसल्यामुळे झाल्यामुळे मदत मिळालेली नाही, कारण ऑनलाइन नोंदणी करताना सर्व्हर डाऊन असल्याचे सातत्याने दिसत आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन केंद्रांवर सतत जावे लागत आहे, सर्व्हर डाऊन आसल्याने यामध्ये अडचणी येत आहे. सरकारने यामध्ये तातडीने लक्ष द्यावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी, अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली आहे.
