#

Advertisement

Tuesday, October 28, 2025, October 28, 2025 WIB
Last Updated 2025-10-28T13:06:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

एकनाथ खडसेंच्या घरी चोरी

Advertisement

उघडी कपाटं, विखुरलेलं सामान अन् पडलेल्या किल्ल्या 

जळगाव : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंप वर काही दिवस पूर्वी चोरी झाल्याची घटना घडली होती. आता, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावतील मुक्ताई बंगला निवासस्थानी चोरी झाल्याचे समोर आले आहे . एकनाथ खडसे यांच्या जळगाव मधील निवासस्थानी चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजाचं कुलूप तोडत, तळ मजला तसंच पहिला मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी केली. 
नेमकं चोरट्यांनी किती मुद्देमाल चोरून नेला ही माहिती प्राथमिक स्वरुपात समोर आली नव्हती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले, त्यांच्याकडून पाहणी करण्यात आली. मंगळवारी आज सकाळी साफसफाई करणारे कामगार आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 
एकनाथ खडसे यांच्या चोरीच्या घटनेबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी तपासानंतर अधिकृत माहिती देत घटनेचा सर्व तपशील दिला. 868 ग्रॅम एवढं सोन आणि 35 हजार रुपये एवढा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितलं. घटनास्थळी श्वानपथक तसंच ठसे तज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच पोलीस ठाण्याची ही स्वतंत्र पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासणी केली जात असून अद्याप संदर्भातील कोणतेही धागेदोरे पोलिसांना मिळाले नसल्याचं समोर आलं आहे. सदर घटनेनंतर त्यासंदर्भातील सीसीटीव्ही व्हिडीओसुद्धा समोर आला, जिथं ही घटने नेमकी कशी घडली हे उघडकीस आलं.