#

Advertisement

Friday, October 31, 2025, October 31, 2025 WIB
Last Updated 2025-10-31T11:33:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूर जिल्ह्याला हादरवून टाकणारी गंभीर

Advertisement

सोलापूर : सातारा जिल्ह्यातील फलटणनंतर सोलापूर जिल्ह्याला हादरवून टाकणारी गंभीर घटना समोर आली आहे, बेकायदेशीर कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याने 10 जणांकडून महिला कर्मचाऱ्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला आहे. याप्रकरणी सोलापुरातील किश्त फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील निम्याहून अधिक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचाराला कंटाळून महिला आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलणार होती. मात्र सुदैवाने पोलिसांनी मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला.
सोलापुरातील किश्त फायनान्स कंपनीच्या कार्यालयात ही घटना घडली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीची दखल न घेता उलट पीडितेलाच ‘अशा मुली चारित्र्यहीन असतात’ अशी शेरेबाजी करणाऱ्या एचआरवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी किश्त फायनान्स कंपनीचे सोलापूर ब्रँच मॅनेजर निलेश पायमल्लेसह एकूण 10 आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या कार्यालयात एकूण 14 व्यक्ती कामाला असून केवळ एकच महिला कर्मचारी कामाला होती. तिच्यासाठी स्वतंत्र वॉशरूमची व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. उलट पीडिता वॉशरूमचा वापर करायाला जाताना आरोपी तिच्यावर अश्लील शेरेबाजी करत छेड काढायचे असा आरोप आहे. मागील अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकारमुळे पीडित तरुणी ही प्रचंड मानसिक दबावाखाली येऊन आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचली होती. सुदैवाने पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ दखल घेत पीडित तरुणीचे मानसिक समुपदेशन केल्याने अनर्थ टळला आहे.