Advertisement
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख नेते, खासदार आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि 'सामना' या शिवसेना मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचा बिघाड झाला त्यांना गर्दीत जाण्यास निर्बंध आले आहेत. राऊतांनी स्वत: याबद्दल ही माहिती दिली. आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण सध्या माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले, उपचार सुरु आहेत. यातून मी लवकरच बाहेर पडेन, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे यावर निर्बं घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज असल्याचे राऊत म्हणाले. मी ठणठणीत बरा होऊ साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईल. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहूद्या, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत बावनकुळेंच्या भ्रष्टाचाराची फाईल उघडणार?
संजय राऊतांनी दोन आठवड्यापूर्वी बावनकुळेंचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.बावनकुळेंची प्रॉपर्टी विकली तरी शेतक-यांची कर्जमाफी होईल असा दावा राऊतांनी केला. दरम्यान माझी प्रॉपर्टी विकून राऊतांनी शेतक-यांची कर्जमाफी करावी असं आव्हान बावनकुळेंनी दिले. संजय राऊतांनी बावनकुळेंना इशारा दिल्यानंतर भाजप नेते देखील आक्रमक झाले आहेत. संजय राऊत स्वत:चं भ्रष्टाराच्या प्रकरणात जामिनावर आहेत. त्यामुळे त्यांना बावनकुळेंवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे. संजय राऊतांनी बावनकुळेंना दोन आठवड्यांचा अल्टिमेटम दिला आहे.तर बावनकुळेंनी देखील राऊतांना प्रतिआव्हान दिलं आहे., त्यामुळे राऊत बावनकुळेंच्या कोणत्या भ्रष्टाचाराची फाईल राऊत उघडणार, आता लक्ष लागले आहे.
