#

Advertisement

Friday, October 3, 2025, October 03, 2025 WIB
Last Updated 2025-10-03T12:22:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ऑक्टोबर महिन्यातही मुसळधार पावसाचा अंदाज

Advertisement

पुणे :  1 जून ते 30 सप्टेंबरमध्ये या चार महिन्यात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यात राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याच पाहिला मिळाला. मराठवाडा आणि सोलापुरात पावसाने थैमान घातला आहे. या पावसामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सर्वाधिक पाऊस मराठवाड्यात झाला आहे. आता ऑक्टोबर महिन्यातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ऑक्टोबर महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. राज्यात यंदा 120 टक्के अधिक पावसाची नोंद झाली असून जून ते सप्टेंबरमध्ये राज्यात 1189.4 मिमी पावसाची नोंद झाल्याचा हवामान विभागाने सांगितलंय. गेल्यावर्षी राज्यात 1252.1 मिमी पावसाची नोंद झाली असून 26 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्यांदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.