#

Advertisement

Friday, October 3, 2025, October 03, 2025 WIB
Last Updated 2025-10-03T12:08:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिर्डी साईबाबा संस्थानकडून अतिवृष्टी बाधितांना मदत

Advertisement

शिर्डी : साईबाबा संस्थानकडून अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. साईबाबा संस्थानकडून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
शिर्डी संस्थानने यापूर्वी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. पूर्वीचे 1 कोटी आणि आता पुन्हा 4 कोटी अशा 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्यतेसाठी उच्च न्यायालयाकडे पाठवला आहे. 50 लाख रुपयांवरील खर्चासाठी साई संस्थानला उच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक असते. ही मदत मुख्यमंत्री सहाय्यात निधीसाठी साई संस्थान देणार 5 कोटी रुपये देणार आहे. राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत शिर्डीचे साई संस्थान मदतीसाठी सरसावले आहे. यापूर्वीही देशातील आपत्कालीन परिस्थितीत साई संस्थाकडून भरघोस मदत दिली गेली आहे. आता राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत साई संस्थानने सामाजिक बांधिलकी पुन्हा जपली आहे. 

शेतकऱ्यांना  ई-केवायसीची अट शिथिल 
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीतला मोठा अडथळा राज्य सरकारच्या वतीने दूर करण्यात आला आहे.ई केवायसीची अट राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आली आहे.अतिवृष्टी बाधित अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नसल्यानं त्यांच्या खात्यावर मदत मिळणार नसल्याच्या तक्रारी होत्या.त्यामुळे मदतीपासून कोणताही शेतकरी अथवा बाधित वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने ई-केवायसीची अट शिथिल करण्यात आली असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.