#

Advertisement

Tuesday, October 14, 2025, October 14, 2025 WIB
Last Updated 2025-10-14T12:42:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज.....

Advertisement

भाजप प्रणीत NDA मध्ये तणाव 

दिल्ली : बिहारमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. असं असताना एनडीएमध्ये जागावाटपावरुन अद्याप एकमत झालेलं नाही. अनेक दिवसांपासून एनडीएच्या घटक पक्षांमध्ये चर्चा सुरु आहेत. बोलणी अंतिम टप्प्यात असताना मुख्यमंत्री नितीश कुमार जागावाटपावर खुश नसल्याची माहिती आहे. NDA मध्ये चार जागांवरुन पेच निर्माण झाला आहे. यात उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची जागा आहे. तारापुर सीट शिवाय जेडीयू नेते नितीश कुमार अन्य तीन जागांवरुन सुद्धा नाराज आहेत. या तीन जागा चिराग पासवान यांना दिल्या आहेत. नितीश कुमार यांना ज्या तीन जागा हव्या आहेत, त्यात सोनबरसा,राजगीर आणि मोरवा या सीट्स आहेत. सोनबरसा जागेवर नीतीश सरकारमधील मंत्री रत्नेश सदा जनता दल यूनायटेडचे उमेदवार आहेत.
उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या तारापुर सीटशिवाय सोनबरसा,राजगीर आणि मोरवा या तीन विधानसभा जागांवरुन मतभेद आहेत. त्यावरुन एनडीएमध्ये एकमत होत नाहीय. जागा वाटपावर जनता दल यूनायटेडचे नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार सहमत नाहीत.
बिहार भाजपमधील सर्वात मोठा चेहरा असलेले सम्राट चौधरी यांच्या तारापुर विधानसभेच्या जागेवरुन पेच निर्माण झाला आहे. भारतीय जनता पार्टी या जागेवरुन सम्राट चौधरी यांना उतरवण्याची तयारी करत आहे. पण नितीश कुमार यांना यावर आक्षेप आहे. नितीश यांना असलेली आपत्ती लक्षात घेऊन भाजपने सम्राट चौधरी यांच्यासाठी प्लान B तयार केला आहे. या योजनेतंर्गत त्यांना पटनाच्या कुम्हरार किंवा पटना साहिब जागेवरुन उतरवण्याचा विचार केला जात आहे. 
बिहारमध्ये यावेळी दोन टप्प्यात (6 आणि 11 नोव्हेंबरला) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 17 ऑक्टोंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. त्यासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. बिहारच्या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपावरुन घोळ सुरु आहे.