Advertisement
"त्या" विधानामुळे राजीनाम्याची मागणी
पुणे : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी फलटणमधील मयत महिला डॉक्टर प्रकरणामध्ये केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षाकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. बीडमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत काही तरुणांनी बीड शहरातील बशीरगंज भागात असलेल्या बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन केलं. रूपाली चाकणकर यांनी दोन दिवसांपूर्वी मृत महिला डॉक्टर बाबतीत वादग्रस्त विधान केले. त्यामुळे या विधानाने पीडित कुटुंबाच्या भावना दुखावल्या असून चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. पीडित डॉक्टर कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करत शोले स्टाईल आंदोलन बीडमध्ये करण्यात आलं.
महिला आयोग सुपारी वाजविण्यासाठी येतंय का? : सुषमा अंधारे
"महिला आयोग मृत मुलीच्या सीडीआर बद्दल बोलता. मग निंबाळकर नाईकांचे सीडीआरही खुले करा," अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केली आहे. "राष्ट्रीय महिला आयोगाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे खुलासा मागितला पाहिजे.बीडमध्ये टॅावरवर चढून तरूण चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. कारण मृत भगिनीची बदनामी महिला आयोग करत आहे. मृत तरूणीच्या हातावर लिहलेले हस्ताक्षर आणि त्यांचे चार पानी पत्रातील हस्ताक्षर जुळत नाही. पत्रातील निरीक्षक हा शब्द नऊ वेळा आला आहे. यातील निरीक्षक मधील वेलांटी दुसरी आहे व हातातील निरिक्षक या शब्दात वेलांटी पहिली आहे. हस्ताक्षरही जुळत नाही. महिला आयोग सुपारी वाजविण्यासाठी येतंय का? कुणाला वाचविण्याचा प्रयत्न होतोय?" असा सवाल अंधारेंनी विचारला आहे.
तुमच्याकडे सिरीयसनेस नाही: तुप्ती देसाई
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून समाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली. "राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून तिच्या चारित्र्याचा हनन करण्यात आलं. महिला आयोग जर महिलांवरच अन्याय करणार असेल तर मग या आयोगाचा उपयोग काय?" अशा सवाल देसाई यांनी केला. "रुपालीताई तुम्हाला हे शोभत नाही. महिला आयोग जे काम करत याच सिरीयसनेस तुमच्याकडे नाही. रूपाली चाकणकर तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षा आहात की राजकारण्यांच्या प्रवक्त्या आहात?
