Advertisement
मुंबई : महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या 0 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेच्या तारखा यापूर्वीच जाहीर झाल्या आहेत. आता सीबीएसई (CBSE) बोर्डाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. ज्या घरात सीबीएसई (CBSE) बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, त्यांनी या तारखा नोंद करुन घ्या. नवीन वर्षात 17 फेब्रुवारी 2026 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. आता विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी करण्यासाठी साडेतीन महिने असणार आहे.
सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षेचं वेळापत्रकाची माहिती मिळणार आहे. शिवाय हे वेळापत्रक विद्यार्थी किंवा पालक डाऊनलोडही करु शकतात. बोर्डाच्या वेळापत्रकानुसार, सीबीएसई 10 वी परीक्षा यंदा 17 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 मध्ये असणार आहे. तर, सीबीएसई 12 वी परीक्षा 17 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2026 पर्यंत असणार आहे. विषयानुसार परीक्षेसाठी नियोजित तारखेच्या दिवशी सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 आणि दुपारी 1:30 वाजेपर्यंत पेपर असणार आहे. यावर्षी सीबीएसई बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार 204 विषयांसाठी भारत आणि जगभरातील 26 देशांतून सीबीएसई बोर्ड परीक्षेसाठी 45 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षा कधीपासून?
महाराष्ट्र स्टेट बोर्डानेही परीक्षेच्या तारखा जाहीर केला असून 12 बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. यंदाच्या वर्षी सुद्धा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे.
