Advertisement
आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत 10 कि.मी.मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण
सोलापूर : शहरात रविवारी सकाळी आयोजित “सोलापूर 10K मॅरेथॉन” स्पर्धेत सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पत्नी आणि लहान मुलीसह सहभागी होऊन नागरिकांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले. त्यांनी कुटुंबासह 10 किलोमीटर अंतर पूर्ण करून आरोग्य, कुटुंबातील एकता आणि फिटनेसचा सुंदर संदेश दिला. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी राजकुमार यांचा उत्साह आणि क्रीडाभाव पाहून कौतुकाची दाद दिली. पोलीस आयुक्तांनी धावतानाच नागरिकांना “फिट राहा, निरोगी राहा” असा संदेश दिला. त्यांच्या पत्नी आणि मुलीनेही उत्साहाने भाग घेत संपूर्ण वातावरण उत्साही बनवले. या उपक्रमाद्वारे पोलीस आयुक्तांनी दाखवून दिले की, प्रशासनातील अधिकारीदेखील समाजात आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीबाबत आदर्श निर्माण करू शकतात. नागरिकांनी त्यांचे हे उदाहरण प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
