#

Advertisement

Friday, October 3, 2025, October 03, 2025 WIB
Last Updated 2025-10-03T12:46:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरात केमिकल कंपनीला भीषण आग

Advertisement

सोलापुर : चिंचोली एमआयडीसीमधील तुळजाई असोशिएट कंपनीला भीषण आग लागली आहे. ही एक केमिकल कंपनी आहे. त्यामुळे ही आग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आग लागलेल्या ठिकाणी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात स्फोटाचे आवाज येत आहेत. त्यामुळे कंपनीच्या आत नेमकं काय घडतंय, याचा अंदाज कोणालाही बांधता येत नाही. या कंपनीला आग लागल्यानंत इतर कामगारांना सुरक्षित ठिकाणी लहवण्यात आले आहे. सोबतच लोकांना आग लागलेल्या कंपनीकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.आगीची घटना समजताच अग्निशामक दलाला सूचना देण्यात आलेली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.