#

Advertisement

Thursday, October 9, 2025, October 09, 2025 WIB
Last Updated 2025-10-09T16:57:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सराफ बाजाराची "दिवाळी"

Advertisement

गुंतवणूक ठरत आहे फायदेशीर 

पुणे : गुंतवणुकदारांसाठी 2025 हे वर्षे गोल्डन टाइम ठरलं आहे. या वर्षात सोन्याच्या दरात 50 टक्के तेजी आली आहे. बाजारात सोनं 1 लाख 20 हजार रुपयांवर पोहोचलं आहे. तर कॉमेक्सवर सोन्याने 4000 डॉलर प्रति औंस पार केले आहे. आजदेखील सोन्याचे दर चांगलेच गगनाला भिडले आहेत. संपूर्ण वर्षभराचा हा कालावधी सराफ बाजारासाठी "दिवाळी"च ठरला आहे. 
सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे. 2008च्या आर्थिक मंदीच्या वेळी जानेवारी 2008 ते 2011 या दरम्यान 100 टक्के तेजी आली होती. त्यानंतर 2020मध्ये कोविडनंतरही सोन्याचा दर 53 टक्क्यांनी वाढला होता. 2025मध्ये पुन्हा एकदा सोन्याचा वाढला आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,150 रुपयांनी वधारला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,150 रुपयांची वाढ झाली असून 1,23,170 रुपयांवर स्थिरावलं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,050 रुपयांची वाढ झाली असून 1,12,900 रुपयांवर स्थिरावले आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 560 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं एक तोळा सोनं 92,380 रुपयांवर स्थिरावलं आहे. { पुणे बाजारात उल्लेख केलेल्या दारात फरक पडू शकतो.}   

10 ग्रॅम सोनं किंमत 
...........................................
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,12, 900 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,23,170 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 92,380 रुपये