#

Advertisement

Thursday, October 9, 2025, October 09, 2025 WIB
Last Updated 2025-10-09T17:05:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पुरंदर विमानतळ : जमिनीतील गुंतवूणक ठरणार अधिक फायदेशीर

Advertisement

राज्यातील एक महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प 

पुणे :  पुरंदर विमानतळ प्रकल्प हा राज्यातील एक महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प मानला जातो. यामुळे पुणे जिल्हा आणि परिसराचा विकास, गुंतवणूक आणि पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भूसंपादन अंतिम टप्प्यात आले आहे. शेतकऱ्यांना किती मोबदला द्यायचा त्याचा निर्णय झाला असून त्यानुसार मोबदला वाटप लवकरच सुरु होत आहे. यात स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. यासह या परिसरात गुंतवणूक करणाऱ्यांचाही फायदा होणार आहे. विशेषतः जमिनीतील गुंतवूणक अधिक फायदेशीर ठरणार आहे.
नवी मुंबई विमानतळ आता सुरू होत असताना पुण्याच्या पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जवळपास 94  टक्के शेतकऱ्यांनी समहमती दर्शवली आहे. उरलेल्या चार पाच टक्के शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. भूसंपादनासाठीची मोजणी जवळपास 60 टक्के पूर्ण झाली आहे. उर्वरीत मोजणी ही 16-17 ऑक्टोबरला पूर्ण केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणतात की....  
पुरंदर विमानतळ प्रकल्पात सात गावांचा समावेश आहे. शेतकऱ्यांचे विस्थापन न करता त्यांना प्रस्तावित एरोसिटीमध्ये सामावून घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना इतर कुठे जाण्याची गरज नाही. त्याच ठिकाणी त्यांना ज्यांचे घर जात आहे त्यांना घरासाठी जाग तर ज्यांची शेतजमीन जात आहे त्यांना जमीन दिली जाणार आहे. त्यामुळे स्थानिकांचे रोजगार आणि आर्थिक हित जपले जाईल. शेतकऱ्यांच्या मागण्या, सवलती आणि पुनर्वसनासंबंधी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलल्यामुळे प्रकल्पावरील विरोध हळूहळू ओसरत आहे. 
शेतकऱ्यांना सुरूवातील आपलं गाव सोडावं लागणार. दुसरीकडे जावं लागणार याची भिती वाटत होती. तशी शंका त्यांच्या मनात होती. पण त्यांच्या मनातल्या सर्व शंका प्रशासनाने दुर केल्या आहेत. पुनर्वसन पॅकेजनुसार त्यांना आता गाव सोडण्याची गरज नाही. एरोसिटी अंतर्गत या सात गावातल्या लोकांना कुठेही राहण्याची मुभा मिळणार आहे, त्यामुळे त्यांना आता आपली सहमती दर्शवली आहे. एरोसिटीमध्ये जमीन मिळणं ही मोठी गोष्टी आहे.