Advertisement
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरीही त्यासाठीच्या हालचालींना मात्र बराच वेग आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील एक महत्त्वाचं वृत्त आहे. बीएमसीची प्रभाग रचना अंतिम टप्प्यात असून, ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रभाग आरक्षणही घोषित होणार असल्याचं म्हटलं जात असल्यानं महाराष्ट्रात लवकरच निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात होईल, असंच चित्र दिसत आहे. थोडक्यात जानेवारी मध्यापर्यंत म्हणजे 15 जानेवारीपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका घेतल्या जाऊ शकतात असा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेचा प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा तयार झाल्यानंतर प्रभाग आरक्षण घोषित करण्यात येईल. ओपन/ओबीसी/एससी/ एसटी तसेच महिला आरक्षण यांची सोडत ऑक्टोबर अखेरपर्यंत आरक्षण सोडत काढली जाईल. प्रभाग आरक्षणावर सूचना, हरकतींसाठी 15 दिवसांची मुदत असेल.. तर, प्रभाग आरक्षणाची प्रक्रीया महापालिकेद्वारे राबवली जाईल. प्रभाग आरक्षण अंतीम सुनावणी घेऊनच प्रभाग आरक्षण घोषित केली जाते.
