#

Advertisement

Monday, November 3, 2025, November 03, 2025 WIB
Last Updated 2025-11-03T11:35:14Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अ‍ॅड. असीम सरोदेंची सनद रद्द

Advertisement

तीन महिने वकिली करता येणार नाही

पुणे : पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते व वकील असलेल्या अ‍ॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यात आली आहे. त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात (TV किंवा सोशल मीडियावरील चर्चेत) न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलने ही कारवाई केली आहे. तीन महिन्यानंतर सरोदे पुन्हा वकील म्हणून काम करु शकतात.
तक्रारदाराने असा आरोप केला आहे की सरोदे यांच्या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला आणि न्यायालयांविषयी अविश्वास निर्माण झाला आहे. तक्रारदाराने हे वक्तव्य अशोभनीय, गैरजबाबदार व बदनामीकारक असल्याचे नमूद करून बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती. 12 ऑगस्ट 2025 रोजी या प्रकरणात सुनावणी करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये अ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली अ‍ॅड. संग्राम देसाई आणि अ‍ॅड. नेल्सन राजन हे सदस्य असलेली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली. या प्रकरणात आता असमी सरोदेंविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई तीन महिन्यांसाठी करण्यात आलेली आहे. 

अ‍ॅड. असीम सरोदे) यांचे म्हणणे पुढीलप्रमाणे :

  • मी कोणत्याही प्रकारे न्यायालयाचा किंवा संविधानिक पदांचा अपमान केलेला नाही.
  •  माझे वक्तव्य हे लोकशाहीतील रचनात्मक टीका (constructive criticism) होते.
  • “फालतू” हा शब्द मी अपमानार्थ नव्हे, तर सर्वसामान्य भाषेत वापरला.
  • मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा (Freedom of Speech) हक्क आहे.
  • माझा हेतू न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्याचा नव्हता, तर लोकांना जागरूक करण्याचा होता.