#

Advertisement

Tuesday, November 4, 2025, November 04, 2025 WIB
Last Updated 2025-11-04T18:01:33Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

निवडणुकांचे बिगुल वाजले : 246 नगर परिषदा, 42 नगर पंचायतींसाठी मतदान 2 डिसेंबरला

Advertisement

मुंबई : राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज (मंगळवार, 4 नोव्हेंबर) ही घोषणा केली. या निवडणुकीद्वारे एकूण 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी होईल आणि मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.

: निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम : 

या निवडणुकीसाठी उमेदवारांना 10 नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेला संपूर्ण कार्यक्रम खालीलप्रमाणे: 
अर्ज दाखल करण्याची सुरुवात: 10 नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: 17 नोव्हेंबर
उमेदवारी अर्जांची छाननी: 18 नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 25 नोव्हेंबर
मतदान: 2 डिसेंबरमतमोजणी: 3 डिसेंबर

राज्य निवडणूक आयोगामार्फत एकूण 288 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. 
नगर परिषदा : 246 (यामध्ये 10 नवनिर्मित आणि 236 मुदत संपलेल्या नगर परिषदांचा समावेश आहे.)
नगर पंचायती: 42 (यामध्ये 15 नवनिर्मित आणि 27 मुदत संपलेल्या नगर पंचायतींचा समावेश आहे. उर्वरित 105 नगर पंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही.) 

31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी राज्यात एकूण 1,07,03,576 मतदार आहेत. या मतदारांमध्ये 53,79,931 पुरुष मतदार, 53,22,870 महिला मतदार आणि 775 पारलिंगी मतदारांचा समावेश आहे. या सर्व मतदारांसाठी एकूण 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यांची केंद्रनिहाय मतदार यादी 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल.

निवडणुकीत खर्चाची मर्याद वाढवण्याचा निर्णय, किती आहे खर्च मर्यादा?

अ वर्ग, नगर परिषद, अध्यक्षपदासाठी - 15 लाख

सदस्य-  5 लाख

ब वर्ग नगर परिषद अध्यक्ष- 11 लाख 25 हजार

ब वर्ग नगर परिषद सदस्य -3 लाख 50 हजार

क वर्ग नगर परिषद अध्यक्ष-  7 लाख 50 हजार

क वर्ग नगर परिषद सदस्य -2 लाख 50 हजार

नगर पंचायत अध्यक्ष- 6 लाख 

नगर पंचायत सदस्य - 2 लाख 25 हजार